www.24taas.com, मुंबई
मुंबईत चेंबुरमध्ये शिवसेना कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. यापाठीमागे राजकीय वैर असल्याची शक्यता व्यक्त होते आहे. मुंकुंदनगर परिसरातल्या वॉर्ड क्र. १४२चे शिवसेनेचे कार्यकर्ते सेल्वराज यांची अज्ञात व्यक्तींनी चाकू आणि चॉपरनं हल्ला करत हत्या केली.
घरातून बाहेर बोलवत काही अंतरावर हल्लेखोरांनी हल्ला केला. दरम्यान सेल्वराज यांच्या पत्नी मन्ना यांनी या हल्ल्यामागे काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. तीन दिवसांपासून पतीला धमकी येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत सेल्वराज यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेची साथ धरली होती.
मात्र पोलीस अजूनही मारेकऱ्यांना पकडू शकलेले नाही, त्यामुळे परिसरात तणावचं वातावरण आहे, मात्र हा हल्ला राजकिय द्वेषातून झाला आहे का? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.