सराफा बंदने राज्यातील ग्राहकांची पंचाईत

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारल्याने मुंबई, नाशिकमध्ये सराफा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारल्यामुळे ऐन लग्नसराईतच ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीए. सरकारनं हा जाचक निर्णय रद्द करण्यात येण्याची मागणी सराफा व्यावसायिकांकडून केली जात आहे.

Updated: Mar 17, 2012, 05:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारल्याने मुंबई, नाशिकमध्ये सराफा  बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारल्यामुळे ऐन लग्नसराईतच ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीए. सरकारनं हा जाचक निर्णय रद्द करण्यात येण्याची मागणी सराफा व्यावसायिकांकडून केली जात आहे.

 

 

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारलाय. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सराफा व्यवसायावर एक्साईज टॅक्स आकारलाय. आयात कर २  टक्क्यांवरुन ४  टक्के करण्यात आलाय. दोन लाखांवर सोने खरेदी केल्यास संबंधित ग्राहकांकडून सराफा व्यावसायिकांनी टीडीएस कपात करुन घ्यावा असं बंधन घालण्यात आलंय. या सर्व जाचक निर्णयाविरोधात सराफा व्यापा-यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय. मुंबईमध्ये सराफा व्यावसायिकांच्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. नाशिकमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून ऐन लग्नसराईत ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली.

 

 

कोल्हापुरातले सराफा व्यावसायिकही हा तीन दिवसांचा बंद पाळताएत. या बंदमुळे कोल्हापुरातला गुजरी हा नेहमी गजबजलेला परिसर शांत दिसून येतोय. तर जळगावमध्ये सराफा व्यावसायिकांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगावच्या सुप्रसिद्ध सुवर्ण बाजारात रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, ऐन लग्नसराईतच बाजार बंद असल्यामुळे ग्राहकांना या बंदचा फटका बसला.

 

 

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी शुक्रवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पांच्या निषेधार्थ सुवर्णकार असोसिएशननं आजपासून तीन दिवस पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोनं खरेदीसाठी शनिवार, रविवारचा मुहूर्त शोधणा-या ग्राहकांची मात्र निराशा झालीए अर्थसंकल्पात सरकारनं सेवाकरासहित सर्व कर वाढविल्यानं त्याचा फटका सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांना बसणार आहे. करांचा आकडा वाढविल्यामुळे यापुढील काळात सोन्याच्या किमतीत वाढ होणार आहे.  सरकारच्या या जाचक निर्णयाविरोधात सराफा व्यापा-यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय. त्यामुळेच सरकारच्या जाचक निर्णयाला विरोध करण्यासाठी आजपासून तीन दिवस सराफ बाजार बंद राहणार आहे.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="67139"]