www.24taas.com, मुंबई
वानखेडेवर शाहरुखनं घातलेला धिंगाणा कमी होता की काय, पण त्यावरून निर्माण झालेला वाद काही थांबण्याची चिन्ह नाहीत. सहानुभूती मिळवण्यासाठी शाहरुख मुलांचा वापर करतोय, असा आरोप आता एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी केलाय. आता शाहरुबाबत जो काही निर्णय घ्यायचाय तो पोलिसच घेतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
मंगळवारी, वानखेडे मैदानावर दारुच्या नशेत शाहरुखनं धिंगाणा घालत सुरक्षा रक्षकांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप एमसीएनं केलाय. पण, शाहरुखने मात्र स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, सुरक्षा रक्षकांनी माझ्या मुलांना धक्काबुक्की केली, मलाही शिव्या दिल्या. मग मीही शिव्या दिल्या. पण त्यावेळी मी मद्यप्राशन मात्र केले नव्हते. मी माफी मागणार नाही, त्यांनीच माझी माफी मागावी, असंही त्यानं यावेळी म्हटलं होतं. यानंतर एमसीएनं शाहरुखसहीत इतर चार जणांविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हाही दाखल केलाय.