बँक घोटाळा : काँग्रेस आमदाराला १२९.३१ कोटींचा दंड!

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित १४९ कोटीच्या घोटाळयाप्रकरणी सहकार विभागाने कॉंग्रेस आमदार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाखांचा दंड लावला आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 28, 2013, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित १४९ कोटीच्या घोटाळयाप्रकरणी सहकार विभागाने काँग्रेस आमदार आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाखांचा दंड लावला आहे.
केदार यांना ही रक्कम एका महिन्याचा आत भरण्याचे आदेश या प्रकरणातील चौकशी अधिकारी आणि सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक यशवंत बागडे यांनी आपल्या अहवालात दिले आहेत. या शिवाय बँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक अशोक चौधरी यांच्यावर देखील २५ कोटी ९१ लाखाचा दंड ठोठावला आहे. त्या काळातील बँकेचे इतर सहा संचालकांना केवळ १०२० रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतला हा घोटाळा १४८ कोटींचा आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ठेवी विना परवाना गुंतवण्यात आल्या. होम ट्रेड आणि इतर खासगी कंपनीमध्ये या ठेवी गुंतवण्यात आल्या. त्यामुळे ही बँक आजही संकटात आहे. सध्या हे सर्व प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.