www.24taas.com, नागपूर
नागपूरमध्ये पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून भाजपच्या नगरसेवकाला अटक केल्यानं एकच खळबळ उडाली.
पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वसंतराव नाईक झोपडपट्टीतल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. त्या धाडीत जागनाथ बुधवारीतले भाजपचे नगरसेवक रमेश पुणेकरला अटक करण्यात आली. अटकेनंतर पुणेकरांची जामिनावर सुटका करण्यात आली.
कारवाईच्यावेळी पोलिसांनी नगरसेवक रमेश पुणेकरची गाडी आणि मोबाईलही जप्त केला. मात्र आपण तिथं जुगार खेळत नव्हतो, तर मित्राला भेटायला गेलो होतो असा दावा रमेश पुणेकरनं केलाय.
शहरातल्या ढासळत्या कायदा - सुव्यवस्थेच्या विरोधात भाजपनं पोलीस आयुक्तांना हटवण्याची मागणी केल्यानं, सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप पुणेकरांनी केलाय.
दरम्यान या घटनेमुळं भाजप विरूद्ध पोलीस आयुक्त असा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होतेय.