www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूर महानगर पालिका यंदा आपलं १५०वं वर्ष साजरे करत आहे. मात्र असं करत असताना पालिकेला आपल्या ध्येयाचा विसर पडल्याचं दिसतंय...गेल्या वर्षी १ लाख वृक्ष लागवडीचं उदिष्ट समोर ठेवत पालिकेने वृक्ष लागवड तर केली मात्र दुर्लक्ष झाल्याने या वृक्षांना यंदाचा पावसाळा ही पाहता आला नाही, त्यामुळे या वृक्ष लागवडीवर करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केलीय.
हिरवं शहर ही नागपूरची ओळख...त्यासाठी गेल्या वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड पालिकेकडून करण्यात आली. १ लाख वृक्ष लावण्याच्या उद्दिष्टाने ही लागवड करण्यात आली. मात्र महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही झाडं पावसाळ्यापर्यंतही टिकू शकली नाहीत. या वृक्षांकडे पाहूनच लक्षात येतं...की त्यांची किती देखभाल करण्यात आली आहे...त्याच बरोबर या वृक्षांच्या भोवतील जी ट्री गार्ड लावण्यात येणार होती...ती देखील पावसाच्या पाण्यात गंज खात पडली आहेत. वृक्ष लागवड अशी असते का असा प्रश्न विरोधकांनी विचारलाय.
या बाबत महानगर पालिकेने विरोधकांचे आरोप फेटाळत शहरात 80 % पेक्षा जास्त वृक्ष लागवड केला असल्याचा दावा केलाय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपात वृक्ष लागवडीचा मुहूर्त कधी लागेल हाच प्रश्न नागपुरकरांना पडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.