चोर सापडला... पण, गांधीजींचा चष्मा कुठंय?

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम गांधी आश्रमातील बहुचर्चित चष्मा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेने चष्मा चोरणाऱ्या कुणाल वैद्यला अटक करत प्रकरणाचा छडा लावलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 3, 2013, 11:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम गांधी आश्रमातील बहुचर्चित चष्मा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेने चष्मा चोरणाऱ्या कुणाल वैद्यला अटक करत प्रकरणाचा छडा लावलाय. पण, त्यानं चोरलेला गांधीजींचा चष्मा सध्या कुठंय हे मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही.
जून २०११ मध्ये आश्रमातून चष्मा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या चोराला पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय. चोरीच्या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपवण्यात आला होता. मात्र, तीन वर्षात ‘सीआयडी’ला जे जमलं नाही... ते वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं करुन दाखवलंय. त्यामुळं ‘सीआयडी’च्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. तूर्तास कुणाल वैद्यला ‘सीआयडी’कडे सोपवण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.