हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा...

नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाचा पहिला आठवड्यात विशेष कामकाज झालं नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणारा दुसरा आणि शेवटच्या आठवडा व्यस्त ठरणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 16, 2013, 09:49 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाचा पहिला आठवड्यात विशेष कामकाज झालं नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणारा दुसरा आणि शेवटच्या आठवडा व्यस्त ठरणार आहे.
मागील आठवड्यात विधानसभेत महत्त्वपूर्ण जादुटोणा विधेयक सरकारने संमत केले. ते विधेयक या आठवड्यात विधानपरिषदेत संमत करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुंबईसाठीची नवी क्लस्टर योजना आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तर मानवी विकास निर्देशांकासंदर्भातील केळकर समितीचा अहवालही याच अधिवेशनात ठेवला जाण्याची शक्यता आहे. आदर्श चौकशी आयोगाचा अहवाल सरकार विधिमंडळात या आठवड्यात सादर करणार असल्याची तोंडी माहिती सरकारने न्यायालयात दिली आहे. त्यामुळे सरकार हा अहवाल अधिवेशनात मांडणार की नाही याबाबतही उत्सुकता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.