सोनियांच्या सभेला एसटी महामंडळच दावणीला, अनेकांचे हाल

नागपूरमध्ये आज झालेल्या सोनिया गांधींच्या सभेचा मोठा फटता एसटी महामंडळाच्या वाहतुकीला बसला. या सभेत कार्यकत्यांना आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने चक्क १५०० पेक्षा जास्त बसेस बुक केल्या होत्या. एकट्या चंद्रपूर विभागातूनमधून काँग्रेसने ५४६ आरक्षित केल्या होत्या. या गाड्या कमी पडल्यानेर आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतूनही गाड्या मागविल्या. त्यामुळे राजकीय शक्ती दाखवण्याच्या या अट्टहासाचा फटका चंद्रपूरसह विदर्भातील प्रवाशांना बसला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2013, 06:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरमध्ये आज झालेल्या सोनिया गांधींच्या सभेचा मोठा फटता एसटी महामंडळाच्या वाहतुकीला बसला. या सभेत कार्यकत्यांना आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने चक्क १५०० पेक्षा जास्त बसेस बुक केल्या होत्या. एकट्या चंद्रपूर विभागातूनमधून काँग्रेसने ५४६ आरक्षित केल्या होत्या. या गाड्या कमी पडल्यानेर आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतूनही गाड्या मागविल्या. त्यामुळे राजकीय शक्ती दाखवण्याच्या या अट्टहासाचा फटका चंद्रपूरसह विदर्भातील प्रवाशांना बसला.
आज चंद्रपूरातल्या एसटीच्या ७० टक्के फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात ठिकठीकाणी प्रवासी खोळंबले होते. तर नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय झाली. याबाबत प्रवाशांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. बस स्थानकांवर प्रवासाची तासान-तास बसची वाट पाहत ताटकळत उभे होते. चंद्रपूर विभागात केवळ ५०५ बसेस उपलब्ध असल्यामुळे चंद्रपूरच्या एस.टी. च्या अधिका-यांनी इथल्या २०० आणि नजीकच्या भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतून ३४६ बसेस मागवून काँग्रेस पक्षाची मागणी पूर्ण केली आहे.
काँग्रेसने कार्यकत्यांची सोय करण्यासाठी सामान्यांना वेठीस धरल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या एसटी हट्टासामुळे सभेचे सर्व प्रयत्न प्रवाशांच्या मुळावर उठले आहेत. सर्वच बस स्थानकांवर प्रवासी तासान-तास बसची वाट पाहत ताटकळत उभे होते. इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस नागपूरकडे वळविण्यात आल्यामुळे ७० टक्के प्रवासी फे-या रद्द करण्यात आल्या. एकट्या चंद्रपूर डेपोच्या ५०० पैकी ३३५ फे-या रद्द करण्यात आल्या.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून बसेसच्या सर्वाधिक फे-या सोडण्यात आल्यामुळे काँग्रेसने शक्तीप्रदर्शनासाठी याच जिल्ह्यांवरच सर्वाधिक भर दिल्याचे दिसून आले आहेत. दरम्यान, हा ताप केवळ २४ तासांचा असल्याचे एस. टी. चे अधिकारी सांगत आहेत. मात्र बसेस विविध ठिकाणी गेल्याने त्या पुन्हा आगारात येईपर्यंत म्हणजे तब्बल दोन दिवस प्रवासांना याचा फटका बसणार आहे. काँग्रेसच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.