गँग्स अॅट `गंगापूर`!

नाशिक शहरातील रात्रीच्या सुमारास गजबजणा-या गंगापूर रस्त्यावर धुमश्चक्री झाली. या मारहाणीत शहरातील बहुचर्चित मोहन चांगलेसह दोन जणांची हत्या करण्यात आली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2013, 09:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहरातील रात्रीच्या सुमारास गजबजणा-या गंगापूर रस्त्यावर धुमश्चक्री झाली. या मारहाणीत शहरातील बहुचर्चित मोहन चांगलेसह दोन जणांची हत्या करण्यात आली.
हॉटेल विसावामध्ये जेवण करत असताना बोलाचालीतून भांडणं झाली आणि त्याचं पर्यवसान मारहाणीत झालं. मारहाणीत तलवारी आणि गुप्त्या अशी धारदार शस्त्रं निघाली. मोहन चांगले आणि त्यांचे मित्र दीपक सोनोवणे यांच्यावर चार जणांनी हल्ला केला. त्यात या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जुन्या नाशिक परिसरात बराच काळ तणाव होता. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून तीन संशयित फरार आहेत.
विद्यमान महापौर यतीन वाघ यांचे थोरले बंधू दादा वाघ यांचा या हत्येत सहभाग असल्याचा संशय असल्यानं चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.