जळगाव जिल्ह्यात वादळाने केळी बागा भूईसपाट

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, मात्र या पावसामुळे चार जण ठार झाले आहेत.

Updated: Jun 12, 2014, 07:41 PM IST

www.24taas.com, विकास भदाणे, झी मीडिया, जळगांव
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, मात्र या पावसामुळे चार जण ठार झाले आहेत.
तसेच केळीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. तसेच ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय.
केळीचं चोपडा, पारोळा, मुक्ताईनगर, पाचोरा, जळगाव या तालुक्यात मोठ नुकसान झालंय.
वादळी वारा आणि वीज पडून ४ जनांचा मृत्यू झालाय, यात नाशिराबाद येथील नाजीयाबी शेख यांचा डोक्यावर पत्रा आणि दगड पडल्याने मृत्यू झालाय.
वीज पडून पाचोरा तालुक्यातील वेरुळी येथील जाणा पाटील, मुक्ताईनगर येथील चिंचखेडा येथील मीराबाई पाटील यांचा मृत्यू झालाय.
दरम्यान मुक्ताईनगर, चोपडा, रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात, यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.