www.24taas.com, नाशिक
‘रामसर साईट’ या जागतिक पाणथळांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भातील अहवाल नाशिक वन्य जीव विभागाकडून येत्या तीन महिन्यात राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी आणि लोणार सरोवर या स्थळांची नावेही रामसर साईटसाठी पाठविण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येईल.
राज्य वन्यजीव महामंडळाच्या पुण्यातल्या भेटींनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. या साईटमध्ये २५ पाणथळांचा समावेश आहे, मात्र त्यात राज्यातील एकही पाणथळ नाही.