www.24taas.com झी मीडिया, अहमदनगर
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. अहमदनगरमध्ये मराठा आरक्षण देण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी एसटीला टार्गेट केले. आपला राग एसटीवर काढून गाडीच पेटवून दिली.
आरक्षण मुद्द्यावर अखिल भारतीय मराठा सेवा संघाने आंदोलन केले. आंदोलनकांनी रस्तारोका केला. या आंदोलनात काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगरमधील चांदणी चौकात एसटी पेटवून देण्यात आली.
तारकपूर बसस्थानकातून बाहेर पडलेले बस आंदोलकांनी लक्ष बनविले. आंदोलकांनी चालक-वाहक आणि प्रवाशांना बाहेर काढले आणि बस पेटवून दिली. याप्रकरणी सुमारे ६० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर ३० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.