... आणि तिनं जीवन संपवलं!

आजच्या तरुणांमध्ये नैराश्य खूप येतं का? हा प्रश्न वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरुन समोर येतोय. गोदावरी मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीनं मैत्रिणींच्य़ा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 25, 2014, 10:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
आजच्या तरुणांमध्ये नैराश्य खूप येतं का? हा प्रश्न वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरुन समोर येतोय. गोदावरी मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीनं मैत्रिणींच्य़ा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
प्रियंका मुखर्जी असं या विद्यार्थीनीचं नाव असून, तिनं गळफास लावून आत्महत्या केली. हॉस्टेलवर राहणारी प्रियंका तिच्याच रूममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेली आढळली. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं आपल्या आई-वडिलांच्या नावानं एक सुसाईट नोटही लिहिली आहे. यामध्ये आपण मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं प्रियंकानं लिहिलंय.
पोलीस यासंबंधी चौकशी करत आहेत. दरम्यान, उद्यापासून एमबीबीएसच्या फर्स्ट इअरची परीक्षा सुरू होतेय. त्यामुळं प्रियंकाच्या हॉस्टेलच्या मैत्रिणी कॉलेजच्या स्टडी रूममध्ये अभ्यासाला गेल्या होत्या. मात्र प्रियंका रूममध्येच होती. मैत्रिणी परतल्यानंतर त्यांनी खोलीचं दार ठोठावलं मात्र प्रियंकानं दरवाजा न उघडल्यानं पोलिसांना बोलावण्यात आलं आणि हा आत्महत्येचा प्रकार समोर आला.
दरम्यान, प्रियंकानं कोणत्या मैत्रिणींच्या कसल्या त्रासानं आत्महत्या केली याची चौकशी पोलीस करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.