www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
दारणासह गंगापूर धरण तुडूंब भरलं असून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी ओसंडून वाहत असताना गोदावरीचे डावा आणि उजवा कालवा बंद करण्यात आलेत.
हे कालवे पूर्ववत सुरु करावे आणि ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्यातून रहाता, संगमनेर, निफाड या तालुक्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवं अशी मागणी तिथले ग्रामस्थ करत आहे. यासाठी त्यांनी काल सिंचन भवनासमोर टाळ मृदुंग आंदोलन केलं. स्थानिक अधिकाऱ्यांशी भेट घेतली होती. जलसंपदा खात्याचे सचिव आणि मराठवाडा विकास महामंडळाला पत्र दिलं आहे.
राजकीय दबावाखाली गोदावरी पात्रातून मराठवाड्याला पाणी दिलं जातंय. मराठ्वाड्याला पाणी देताना आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. परंतु त्यांचं समाधान झालं नसून आज हे सर्व ग्रामस्थ अजित पवारांची भेट घेणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.