चिल्लर पार्टी, मद्यधुंद मुला-मुलींचा धुडगूस

धार्मिकनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दारुपार्टी रंगल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकजवळच्या तळेगावातल्या ग्रीन रिसॉर्टवर ही पार्टी रंगली.

Updated: Mar 29, 2013, 04:42 PM IST

www.24taas.com, नाशिक
धार्मिकनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दारुपार्टी रंगल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकजवळच्या तळेगावातल्या ग्रीन रिसॉर्टवर ही पार्टी रंगली. सोळा ते १७ वर्षांच्या मुला मुलींसाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत मद्यधुंद मुलांनी दारु पिऊन अक्षरक्ष धुडगूस घातला होता. एका मुलाला पार्टीत प्रवेश घेण्यासाठी पंधराशे ते अडीच हजार रुपये मोजावे लागत होते. तर मुलींना पार्टीत मोफत प्रवेश होता. मद्यधुंद तरुणांनी या परिसरात धिंगाणा घातला होता. या पार्टीसाठी मुलींना फ्री एन्ट्री होती. तर मुलांना २५०० रूपये एन्ट्री फी होती.
तर असाच प्रकार पुण्यातही काही महिन्यांपूर्वी घडला होता. हॉटेल रिव्हर व्हूमध्ये सुमारे सातशे अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला होता. या प्रकरणी काही जागरुक पालकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर `झी २४ तास`नं हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं होतं. त्यावेळी पोलिसांनी पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता.

मात्र हॉटेलचे मालक जयंत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जयतं पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलतबंधू आहेत. त्यामुळंच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याची टीका होत होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.