बलात्कार आणि बदनामीच्या भीतीनं घेतलं जाळून...

अल्पवयीन शाळकरी मुलीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडलीय. आत्येभावानंच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानं बदनामीच्या भीतीनं या मुलीनं हे कृत्य केल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 14, 2012, 07:57 PM IST

www.24taas.com, नाशिक
अल्पवयीन शाळकरी मुलीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडलीय. आत्येभावानंच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानं बदनामीच्या भीतीनं या मुलीनं हे कृत्य केल्याचं समजतंय.
चांदवड तालुक्याकील शिंदे गावात ही घटना घडलीय. या घटनेत संबंधित मुलगी ७० टक्के भाजली असून तिच्यावर नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. दरम्यान, तिचा आत्येभाऊ नराधम स्वप्नील यशवंते याला अटक करण्यात आलीय. स्वप्नीलविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी संबंधित मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने तिला एकट्यात गाठून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलगी त्यास दाद देत नव्हती.

गुरुवारी दुपारी अचानक आरोपी स्वप्नील शिंदे गावात आला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्यानं आपल्या बहिणीवरच बळजबरी करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.