www.24taas.com , झी मीडिया, नाशिक
उन्हाळी कांद्याची घटत चाललेली आवक आणि पावसामुळं लाल कांद्याचं बाजारात लांबलेलं आगमन यात सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव चढेच आहेत.
सोमवारी कळवण बाजारातले भाव प्रति क्विंटल सहा हजारापुढे गेलेत. नवीन कांद्याची मुबलक आवक होण्यास अजून महिना लागणार असल्यामुळं कांदा या दरम्यान सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारेय.
दरवर्षी या कालावधीत गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातला कांदा बाजारात येत असतो. परंतु यंदा त्याठिकाणीही पावसामुळं लाल कांद्याचं आगमन लांबलंय. राज्यातल्या खान्देश, लोणंद आणि पुणे भागातला कांदाही बाजारात येणं सध्या बंद आहे. त्यामुळंच नवीन कांदा बाजारात येईपर्यंत भाववाढ सर्वसामान्यांना सोसावी लागणारेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.