www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात जळोद गावाजवळ तापी नदीवर मोठा पूल बांधण्यात आलाय. या तापीनदीच्या पुलावरून प्रियंका चोपडा खाली उडी मारतेय. पण हे सिनेमाचं शुटिंग आहे.
हे शुटिंग आपल्या जवळच, आपल्याच तालुक्यात सुरू आहे, हे व्हॉटस अॅप फोटो पाहून, मेसेज वाचल्यानंतर, काही तरूणांनी बाईकला किक मारली, कुणी फोर व्हीलर काढली आणि थेट तापी काठावरील जळोदचा पूल गाठला.
मात्र तापी पुलावर रखरखतं उनं आणि संथ वाहणारी नदी, पक्षांची किलबिल या शिवाय काहीचं नव्हतं. त्यापाठोपाठ अनेक तरूण बाईक घेऊन तापीपुलावर घिरट्या मारू लागले.
हे पाहून गावातील लोकांनीही आश्चर्य व्यक्त केलं, गावातील लोकांना तरूणांनी उत्सुकतेने विचारलं, शुटिंग संपलं का?,
गावकऱ्यांनी उलट प्रश्न केले, कोणतं शुटिंग?, कधी झालं?, नाही, कोणतंचं शुटिंग झालं नाही.
तरूणांनी मोबाईलवरचा फोटो दाखवला पाहा, इथेच तर सुरू होतं ना शुटिंग, फोटो नीट निरखून पाहिल्यावर समजलं, हा तो तापीचा पूल नाहीच, फोटोतल्या पुलाखालील पाण्यात लांबच लांब बोटी दिसत होत्या. आणि प्रत्यक्षात मात्र जळोदच्या तापी किनाऱ्यावर वाळू उपसा करणारे जेसीबी दिसतात.
हे तरूणांच्या लक्षात आलं, की कुठला तरी जुना फोटो व्हॉटस अॅपवर टाकून आपल्याला नाडलंय. आपली कुणीतरी फिरकी घेतलीय. आपला पोपट झाला, हे अनेकांना लक्षात आलं, पण न समजल्यासारखं करत त्यांनी परत घर गाठलं. विशेष म्हणजे हा फोटो ट्वीटरवर पण फिरतोय.
म्हणजेच व्हॉटस अॅपवर तुमची कुणीही फसवणूक करू शकतं, सर्वच फोटो खरे असतील असं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.