रेल्वेत महिलेने दिला जुळ्यांना जन्म

इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबईतील कुर्ला इथे राहणारी चमेलीदेवी यादव (२९) या महिलेने रेल्वेमध्ये दोन मुलांना जन्म दिला. तिला वेदना होऊ लागल्याने रेल्वेतील महिला प्रवाशांची धावाधाव सुरु झाली. काही महिला मदतीला आल्याने तिचे बाळंपण सुखरुप पार पाडले.

Updated: Apr 3, 2014, 11:50 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, नाशिक
इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबईतील कुर्ला इथे राहणारी चमेलीदेवी यादव (२९) या महिलेने रेल्वेमध्ये दोन मुलांना जन्म दिला. तिला वेदना होऊ लागल्याने रेल्वेतील महिला प्रवाशांची धावाधाव सुरु झाली. काही महिला मदतीला आल्याने तिचे बाळंपण सुखरुप पार पाडले.
ही महिला बाळंतपणासाठी बिहारमध्ये माहेरी जात होती. पवन एक्स्प्रेसमधून जात असताना वाटेतच चमेलीदेवीला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. डब्यातील काही महिलांच्या मदतीने त्या महिलेचे बाळंतपण सुखरुप पार पडले. या महिलेने जुळ्यांना जन्म दिलाय.
चमेलीदेवी तिच्या भावासोबत पवन एक्स्प्रेसतील आरक्षित एस-७ बोगीतून प्रवास करत होती. इगतपुरी रेल्वेस्थानक गेल्यानंतर तिला वेदना सुरु झाल्या. ही गोष्ट इतर महिलांना कळल्यावर ताबडतोब त्या डब्ब्यातील महिला तिच्या मदतीला आल्यात आणि तिचे यशस्वीपणे बाळंतपण केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.