www.24taas.com, मुंबई
एखादं नाटकं करायचं म्हटलं की अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं...मात्र नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. नुकताच हा अनुभव घेतला तो निखील रत्नपारखी याने
निखिल रत्नपारखी लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित `सी यू अगेन` ह्य़ा नाटकाला हातभार लावत महेश मांजरेकर यांच्या ग्रेट मराठा एन्टरटेनमेंटने `टॉम आणि जेरी` या नावाने रंगमंचावर सादर केलेलं नाटक.
लग्न होऊनही एकमेकांच्या विचारांमध्ये असणा-या तफावतीमुळे वेगवेगळं राहणा-या जोडप्याची ही कथा आहे. या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला आम्ही जाणून घेतल्या त्या निखिल रत्नपारखीच्या भावना. नाटकाचं नाव टॉम आणि जेरी असं असल्याने काहीशी मजा यात असणार हे मात्र नक्की. या नाटकाच्या माध्यामातून कादंबरी कदमने पहिल्यांदाच व्यावसायिक नाटकाचा अनुभव घेतला..
कादंबरीचा बिनधास्तपणा, लाजराबुजरा निखिल रत्नपारखी त्यांच्या अभिनयातून उत्कृष्टपणे सादर होतो...आणि त्याजोडीला समर्पक अश्या संवादामुळे प्रेक्षकांना हे नाटक खिळवून ठेवतं...त्यामुळे तुम्हाला हमखास मनोरंजन हवं असेल तर रंगभूमीवर अवतरलेल्या या टॉम आणि जेरीच्या नक्की भेट घ्या.