www.24taas.com
मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. इव्हिएम मशीनद्वारे मतदान झाल्यानं पहिला निकाल मतमोजणीच्या काही वेळातच मिळण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत संपूर्ण निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयातच मतमोजणी होणार आहे. यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला असून कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात होईल. काल महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं. ४७ प्रभागांमधील ९५ जागांसाठी हे मतदान झालं.
या निवडणुकीत ५१६ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. सध्या महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. ही सत्ता महायुती उलथवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.