www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेनच्या पाडावानंतर इटलीलाही पराभवाच तोंड पहावं लागलं. वर्ल्ड कपमधील हा दुसरा मोठा अप सेट ठरला. चार वेळेची वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या इटलीला कोस्टा रिकाने 1-0ने पराभूत करत दिमाखात नॉक आऊटमध्ये एन्ट्री केली तर दुसरीकडे कोस्टा रिकाच्या विजयामुळे इंग्लंडला वर्ल्ड कपमधून पॅक कराव लागलं.
स्पेनचं साम्राज्य खालसा झाल्यानंतर आता चार वेळेच्या वर्ल्ड चॅम्पियन इटलीलाही पराभवाचा धक्का बसला. विशेष म्हणजे कोस्ट रिकासारख्या टीमकडून इटलीला हा पराभव स्वीकारावा लागला. इटलीला 1-0 ने पराभूत करणाऱ्या कोस्टा रिकाने या विजयाबरोबरच नॉक आऊटमध्येही धडक मारली.
कॅप्टन ब्रायन रुईझने हेडरने शानदार गोल करत तब्बल 24 वर्षांनंतर कोस्टा रिकाला नॉक आऊटमध्ये एन्ट्री मिळवून दिली. मॅचच्या 43व्या मिनिटाला कॅम्पबेलला इटलीच्या गोलपोस्टनजीक पाडण्यात आल्यानंतरही कोस्टा रिकाला पेनल्टी देण्यास रेफ्रिंनी नकार दिला. कोस्टा रिकाने मात्र न खचता आपलं आक्रमण कायम ठेवल. यानंतर लगेचच म्हणजे 44 व्या मिनिटाला ज्युनिअर डियाद्वारे मिळालेल्या क्रॉस पासवर ब्रायन रुईझने हेडरने गोल करत कोस्टा रिकाला 1-0ने आघाडी मिळवून दिली.
सेकंड हाफमध्ये दोन्हीही टीम्सने आक्रमक खेळ केला. इटली बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील होती तर कोस्टा रिका आपली आघाडी अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, दोन्हीही टीम्सला सेकंड हाफमध्ये गोल करता आला नाही. दोन्हीही टीम्समध्ये जबरदस्त रस्सीखेच पहायला मिळाली. यामध्ये इटलीच्या मारियो बालोटेली आणि कोस्टा रिकाच्या जोस मिग्वेल कुबेरो लोरियाला यलो कार्ड दाखवण्यात आलं.
इटलीचा स्टार स्ट्रायकर मारियो बोलोटेली पूर्णपणे फ्लॉप ठरला. पहिल्या हाफमध्ये त्याला दोनदा गोल करण्याची संधी मिळाली मात्र त्याला गोल काही करता आला नाही. आता इटलीचा उरुग्वेबरोबर होणारा मुकाबला निर्णायक ठरणार आहे. इटलीला नॉक आऊटमध्ये जाण्यासाठी कमीत कमी ड्रॉची गरज आहे. या वर्ल्ड कपमध्ये लास्ट सिक्सटीनमध्ये प्रवेश करणारी कोस्टा रिका पहिली टीम ठरली आहे. कोस्टा रिकाने यापूर्वी 1990 मध्ये नॉक आऊटमध्ये धडक मारली होती. कोस्टा रिकाने टॉप टेनमधील दोन टीम्सला पराभूत करत फुटबॉल विश्वात एकच खळबळ माजवून दिलीय.
फ्रान्सनं स्वित्झर्लंडचा उडवला 5-2 नं धुव्वा...
फ्रान्स आणि स्विर्झलंड दरम्यान झालेल्या मॅचमध्ये गोल्सची बरसात पहायला मिळाली. फ्रान्सने पाच गोल केले तर स्विर्झलंडने 2 गोल केले. फ्रान्सने 5-2 नं मुकाबला जिंकत 6 पॉईंट्सची कमाई करत ग्रुप 'ई'अव्वल स्थान पटकावलय. पहिल्या हाफमध्ये फ्रान्सने 17, 18 आणि 40 व्या मिनिटाला गोल केले. तर सेकंड हाफमध्ये फ्रान्स आणि स्विर्झलंडने प्रत्येकी दोन गोल झळकावले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.