अभय चौटाला 'आयओए'चे नवे अध्यक्ष

अभय चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. रणधीर सिंह यांनी मैदानातून माघार घेतल्यानं चौटाला यांची बिनविरोध निवड झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 6, 2012, 11:20 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अभय चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. रणधीर सिंह यांनी मैदानातून माघार घेतल्यानं चौटाला यांची बिनविरोध निवड झालीय. सोबतच उपाध्यक्ष पदावर वीरेंद्र नानावती, महासचिव पदासाठी ललित भानोत तर कोषाध्यक्ष म्हणून एन. रामचंद्रम यांचीही बिनविरोध निवड झालीय.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघनेनं (आयओसी) केलेल्या निलंबनाच्या कारवाईची पर्वा न करता आयओएची निवडणूक बुधवारी पार पडली. वार्षिक सभेसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. यामध्येच ही निवडणूक पार पडली. नवनिर्वाचित ललित भानोत हे कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी एकदा जेलची सफर करून आले आहेत.
संघटनेनं कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा दावा, आयओसीनं केलाय. आयओसीला झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी दोन सदस्यांचा समावेश असलेली एक समिती लुसानच्या मुख्यालयाला भेट देईल, असं अभय चौटाला यांनी म्हटलंय.
आयओएवर लालदेल्या बंदीची पर्वा न करता घेतल्या गेलेल्या या निवडणूकीमध्ये काहीही चुकीचं नसल्याचं चौटाला यांनी म्हटलंय. हा सर्वसंमतीनं घेतलेला निर्णय होता असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.