www.24taas.com, वृत्तसंस्था, साओ पावलो
फुटबॉलच्या पंढरीत अर्थातच ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा रंगला. या सोहळ्यात ब्राझीलच्या संस्कृतीची झलक पहायाला मिळाली. अतिशय छोटेखानी झालेल्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये ब्राझीलचे वेग-वेगळे रंग पाहायला मिळाले.
या रंगारंग कार्यक्रमाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. डोळ्याचं पारण फेडणा-या या उदघाटन सोहळ्यामुळे जगभरातून ब्राझीलमध्ये आलेल्या फुटबॉलप्रेमींचं चांगलचं मनोरंजन झालं. ब्राझीलच्या १२ शहरांचे प्रमुख राजकीय नेते उद्घाटन सोहळ्यासाठी साओ पावलो येथील कोरिनथिआन्स एरिना स्टेडियमवर उपस्थित होते. दरम्यान, जनतेच्या विविध मागण्यांसाठी ब्राझीलमध्ये निदर्शने करण्यात आली. स्पर्धेच्या स्टेडियम बांधणीकरिता ११ अब्ज डॉलर खर्च करण्यात आल्यामुळे ब्राझिलियन जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली होती. उद्घाटन सोहळ्याआधी ब्राझिलियन जनतेच्या संतापाचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळाला.
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडत आणि रबरी गोळ्या झाडून निदर्शकांना रोखले. याठिकाणी विश्वचषक होणार नाही, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. २७ वर्षीय ग्रेगरोय लिओ या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने निदर्शकांची भूमिका मांडली. त्याचवेळी या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.