www.24taas.com, वृत्तसंस्था, केप्टाऊन
आपली प्रेयसीची हत्या करणारा दक्षिण आफ्रिकेचा 27 वर्षीय धावपटू ऑस्कर पिस्टोरियस खटल्याच्यावेळी साक्ष देताना भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांने प्रेयसी रीवा स्टीनकॅंपच्या नातेवाईकांची माफी मागितली.
मी माझ्या रीवाला गोळ्या घातल्यानंतर तिला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. रीवाची हत्या केल्यानंतर मला भयानक भीतीदायक स्वप्न पडत आहेत. त्यामुळे मला झोपच लागत नाही. खून केला त्यावेळी मला त्यादिवशी झोपच लागली नाही. मी रात्री कधीही घाबरून उठत असे, असे पिस्टोरियस यांने साक्ष देताना सांगितले.
फेब्रुवारी 2013 रोजी राहत्या घरी भांडणानंतर रीवाला गोळी घातली. मात्र, ही गोळी चुकून घातली. मला वाटलं माझ्या घरात कोणीतरी घुसले आहे. त्यामुळे मी गोळी झाडली. ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या ऑस्करने स्टीनकॅंपच्या कुटुंबियांना सांगितले, या दुर्घटनेनंतर माझा अशी वेळ गेलेली नाही, की तुमची कधी आठवण काढली नाही. तुमच्याबद्दल मी नेहमी विचारच करीत आलोय. मी रीवाला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यादिवशी रात्री झोपण्याच्या आधी खूप समजावले, असे त्यांने सांगितले. हा खटला ऐकण्यासाठी कार्टात खूप गर्दी झाली होती. रीवाच्या आईचा चेहरा भावशून्यात होता.
माझे बालपन हालाकीचे गेले. खूप संघर्ष करावे लागले. लहान वयात दोन्ही पाय गमवावे लागले होते. त्याची जागा कृत्रिम पायांनी घेतली. त्यानंतर तो पुन्हा पायावर उभा राहू लागला. यावेळी तिला विचारण्यात आले की, तुमच्या कुटुंबियांपैकी कोणी क्राईममध्ये सहभागी आहे का? त्यावेळी सांगितले की, कोणत्याही गुन्हात सहभाग नाही. मात्र, अनेकांशी सामना करण्यात माझे बालपण गेले. यावेळी त्यांने सांगितले, एके दिवशी एक कार माझा पाठलाग करत माझ्या मोहल्ल्यापर्यंत आली. मात्र, माझ्याजवळ बंदूक होती. त्यावेळी कारमधील दोघे पळून गेलेत. तर दुसऱ्या एका घटनेत एका टॅक्सी चालकांला दोघे जण तंग करीत होते. त्यावेळी मी बंदूक काढली होती. त्याचवेळी दोघांनी टॅक्सी चालकाच्या डोक्यावर दगड मारला. मी बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर ते पळून गेलेत.
डिसेंबर 2012मध्ये एका पार्टीत माझ्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी डोक्यावर एक जखम झाली. काही टाके पडले होते. मी सांगतो, मला देवाचा आर्शीवाद मिळाला. त्यामुळे रीवा मिळाली. पहिल्या भेटीनंतर मी देवाचे आभार मानले. मी नेहमी इसाई मुलीसाठी प्रार्थना करीत होतो. मला रीवाच्या माध्यमातून इसाई मुलगी मिळाली., यावेळी तो अधिकच भावनिक झाला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.