धैर्यासाठी मुंबईकर धावतायेत, हाफ मॅरेथॉन पूर्ण

गुलाबी थंडीत मुंबईकर धावतायत. संपूर्ण मुंबई एकत्र, एकमेकांसाठी धावतेय. एका धैर्यासाठी मुंबईकर धावतायत. कारण मुंबईची शान असलेल्या दहाव्या मॅरेथॉनला सुरुवात झालीय. पहाटे ५.४० वाजता सुरु झालेली पुरुषांची हाफ मॅरेथॉन नरेंद्र सिंगने तर महिलांची हाफ मॅरेथॉन सुधा सिंगनं जिंकलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 20, 2013, 08:09 AM IST

www.24taas.com,मुंबई
गुलाबी थंडीत मुंबईकर धावतायत. संपूर्ण मुंबई एकत्र, एकमेकांसाठी धावतेय. एका धैर्यासाठी मुंबईकर धावतायत. कारण मुंबईची शान असलेल्या दहाव्या मॅरेथॉनला सुरुवात झालीय. पहाटे ५.४० वाजता सुरु झालेली पुरुषांची हाफ मॅरेथॉन नरेंद्र सिंगने तर महिलांची हाफ मॅरेथॉन सुधा सिंगनं जिंकलीय.
तब्बल ४० हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे मुंबई मॅरेथॉनची उत्सुकता सा-याच मुंबईकरांना लागली होती. नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचाही उत्साह शिगेला पोहचलाय. सलमान खान, अनिल अंबानी, दिया मिर्झा, शरमन जोशी, राहुल बोस, विवेक ओबेरॉय, डिनो मोरिया यासारख्या सेलिब्रिटी भल्या पहाटे मुंबईकरांचा उत्साह वाढवण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत.

विविध गटात ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मुंबई मॅरेथॉन (हाफ) - पुरुषांमध्ये नरेंद्र सिंग, सचिन पाटील, अटवा भगत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर मुंबई मॅरेथॉन (हाफ) - महिलांमध्ये सुधा सिंग, रितू पाल आणि मोनिका आथरे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय यांनी पटकावला.