सिडनी : श्रीलंकेचा आघाडीचा बॅट्समन तिलकरत्ने दिलशान इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेट क्लब डर्बीशायरसाठी आता खेळणार आहे. तसा करार या क्लबने दिलशानसोबत केला आहे.
दिलशान जूनमध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या जागी विदेशी खेळाडू म्हणून डर्बीशायरसाठी खेळणार आहे.
"दिलशान मॅच जिंकविणारा खेळाडू आहे आणि त्याचं आमच्या टीमसाठी खेळणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे", अशी प्रतिक्रिया डर्बीशायरचे परफॉर्मेन्स डायरेक्टर ग्रॅम वेल्क यांनी दिली आहे.
यापू्र्वी दिलशान २०१४ मध्ये सरेकडून खेळला होता. दिलशानने ८७ आतंरराष्ट्रीय टेस्ट मॅचेस मध्ये ४०.९८ च्या सरासरीने ५,४९२ रन्स केले आहेत. तसेच ३१३ एकदिवसीय आणि ६२ टी-२० मॅचेस खेळला आहे.