International Railway Station Of India: काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशभरात भारतीय रेल्वेचे जाळं पसरलेले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी ट्रेनची सुविधा आहे. रेल्वेमुळे लाखो भारतीयांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद झाला आहे. भारतात अशी काही रेल्वे स्थानकं जिथून थेट परदेशात जाणारी ट्रेन पकडता येते. यामुळे भारतातील ही रेल्वे स्थानके इंटरनॅशनल रेल्वे स्थानकं म्हणून ओळखली जातात. जाणून घेऊया या रेल्वे स्थानकांविषयी.
भारतातील ही इंटरनॅशनल रेल्वे स्थानकं खूपच खास आहेत. भारतात अशी 7 आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानके आहेत, जिथून ट्रेनने इतर देशांत जाता येते. तसेच तिथून भारतात येण्यासाठी देखील ट्रेन मिळते.
पश्चिम बंगालमधील हल्दीबारी रेल्वे स्टेशन शेजारीच असलेल्या बांगलादेशच्या सीमेपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बांगलादेशात जाण्यासाठी थेट ट्रेन पकडता येते.
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पेट्रापोल रेल्वे स्टेशनवरून ट्रेनने बांगलादेशला जाता येते. येथून दोन्ही देशांचे नागरिक मोठ्या संख्येने सीमा ओलांडतात.
पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात स्थित राधिकापूर रेल्वे स्थानक भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापारासाठी वापरले जाणारे सर्वात मोठे आणि प्रमुख रेल्वे स्थानक आहे . येथून अगदी सहज रेल्वेने बांगलादेशला जाता येते. हे भारतातील तिसरे रेल्वे स्टेशन आहे जिथून बांगलादेशला जाता येते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील चांगले संबंध असल्यामुळे या स्थानकाचा वापर व्यापारासाठी केला जातो.
पश्चिम बंगालप्रमाणे बिहारच्या मधुबनी येथील जय नगर रेल्वे स्टेशनवरु भारताच्या बॉर्डवर असलेल्या देशात जाण्यासाठी ट्रेन पकडता येते. येथून नेपाळला ट्रेनने जाता तसेच येता येते. स्थानिक लोक नेपाळला जाण्यासाठी या स्टेशनचा वापर करतात.
बिहारचे जोगबनी रेल्वे स्टेशनवरुन देखील नेपाळला जाण्यासाठी भारतीय रेल्वेची सोय आहे. इथून नेपाळ खूप जवळ आहे. येथून पायी चालतही नेपाळला पोहोचता येते. नेपाळला जाण्यासाठी ट्रेन हा सर्वात सोपा मार्ग आहे.
पंजाबच्या अटारी रेल्वे स्टेशनचे भारतातील सर्वात प्रसिद्ध रेल्वे स्टेशन आहे. येथून पाकिस्तानला जाता येते.