www.24taas.com, ग्रेटर नोएडा
सेबॅस्टियन व्हेटेल वेगाचा बादशाह ठरला. एफ-1मध्ये सलग दुस-यांदा विजेतेपद पटकावले. भारताचा कार्तिकेयन २१ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
रेडबुलच्या सेबॅस्टियन व्हेटेलनं इंडियन ग्राँप्रीवर सलग दुस-यांदा आपलं नाव कोरलं. पोल पोझिशन मिळालेल्या व्हेटलनं आपली आघाडी शेवटपर्यंत टिकवली आणि विजेतेपदाला गवसणी घातली. त्यानं २०१२फॉर्म्युला वन सीझनमधील सलग चौथं विजेपद पटकावण्याची किमया साधली. तर फेरारीची फर्नांडो अलोन्सोला दुस-या स्थानावर समाधान मानाव लागलं. रेडबलुचा मार्क वेबर तिस-या क्रमांकावर आला.
फोर्स इंडियाचा निको हल्केनबर्ग आठाव्या क्रमांकावर आला. तर नारायण कार्तिकेयन २१ व्या क्रमांकावर फेकला गेला. दरम्यान, या विजेतेपदासह व्हेटलनं ड्रायव्हर्स क्रमवारीत आपली आघाडी आणखी वाढली आहे. २४० पॉईंट्ससह सेबॅस्टियन व्हेटेल पहिल्या क्रमांकावर आहे. तर २२७ पॉईंट्ससह फेरारीची फेलिपे मासा दुस-या स्थानावर आहे. तर लोटसचा किमी रायकोनेन तिस-या स्थानावर आहे.
बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारतीय ग्रांप्री शर्यतीत सेबॅस्टियन व्हेटेल याने ९.४ सेकंदांनी बाजी मारली. चालू मोसमातील हे त्याचे सलग चौथे यश आहे. या शर्यतीच्या पात्रता फेरीत सर्वोत्तम वेळ नोंदवून त्याने काल पोल पोझिशन पटकाविली होती.
शर्यतीत सुरवातीपासून आघाडी घेत सेबॅस्टियन व्हेटेल याने फर्नांडो अलोन्सो आणि आपल्याच संघातील मार्क वेबर यांना पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे अलोन्सो दुसऱ्या स्थानावर तर वेबरला तिसऱ्या स्थानी आला.
मॅक्लालरेनचा लुईस हॅमिल्टन चौथ्या स्थानावर राहिला. सहारा फोर्स इंडियाचा निको हुलकेनबर्ग याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.