www.24taas.com, झी मीडिया, मॉस्को
जमैकाचा तेज तर्रार धावपटू उसेन बोल्टनं ९.७७ सेकंदात शंभर मीटर अंतर पूर्ण करीत वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपची फायनल जिंकली. २६ वर्षीय बोल्टला सेमीफायनलमध्ये अमेरिकेच्या माईक रॉजर्सनं टक्कर दिली होती. मात्र, बोल्डनं ही फायनल जिंगत आपणच वेगाचा बादशहा असल्याचं पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत १०० मीटर शर्यतीचं सुवर्णपदक बोल्टनं पटकावलं तर अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीन आणि जमैकाच्याच नेस्टा कार्टरनं अनुक्रमे दुसरा आणि तिसरा नंबर पटकावला.
विशेष म्हणजे, या शर्यतीत अंतिम आठ जणांमध्ये चारजण जमैकाचेच होते. त्यात दोघांनी पदकं मिळवली. याआधी बर्लिनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत बोल्टनं १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं होतं. तर २०११ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत बोल्ट या शर्यतीत अपयशी ठरला होता. यंदा मात्र त्याने १०० मीटर शर्यतीचं विश्वविजेतेपद परत मिळवलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.