निवडणुकीच्या रिंगणात चहावाला

निवडणूक लढवायची असल्यास मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. त्याचसोबत ‘गॉडफादर’चा आशिर्वादही महत्वाचा असतो. नाशिकमध्ये मात्र चहाचा टपरीवाला निवडणुकीच्या रंगणात उतरला आहे.

Updated: Feb 8, 2012, 10:07 AM IST

www.24taas.com, नाशिक

 

निवडणूक लढवायची असल्यास मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. त्याचसोबत ‘गॉडफादर’चा आशीर्वादही महत्वाचा असतो. नाशिकमध्ये मात्र चहाचा टपरीवाला निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

 

सोपान कडलग त्र्यंबक रोडवर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांनी बनवलेला टेस्टी चहा पिण्यासाठी शहरातले नागरीक दूरदूरवरुन येतात. पण चहाच्या गोडव्याबरोबर त्यांच्या बोलण्यातही गोडवा आहे. त्यामुळे या परिसरात त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. चहाच्या व्यवसायासोबत त्यांनी समाजसेवचंही व्रत घेतलं आहे.

 

आता ते भाकपकडून महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. त्यांचा सामना महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या हेमलता पाटील आणि मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुजाता डेरे या तगड्या उमेदवारांशी आहे. तरीही जनशक्तीच्या जोरावर आपण विजय मिळवू असा कडलग यांना विश्वास आहे.

 

इतर पक्षांचे उमेदवार मोठ्या रॅली काढून प्रचार करत आहेत. पण कडलग मात्र घरोघरी जाऊन मतदारांकडे मत मागतात. आता मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात ते पहावं लागेल.