मनसे नगरसेविकाचा 'दाखला दाखवून अवलक्षण'?

पुण्यात सर्वात कमी वयाची नगरसेविका झाल्याचा मान मनसेच्या प्रिया गदादे हिला मिळाला. मात्र तिच्या वयामुळे तीचं नगरसेवक पद धोक्यात आल आहे.

Updated: Feb 28, 2012, 11:58 AM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात सर्वात कमी वयाची नगरसेविका झाल्याचा मान मनसेच्या प्रिया गदादे हिला मिळाला. मात्र तिच्या वयामुळे तीचं नगरसेवक पद धोक्यात आल आहे. कारण प्रियाच्या जन्मतारखेचे दोन दाखले पुढे आले आहेत. त्यातील एक दाखला बनावट असल्याचा आरोप पराभूत उमेदवारानं केला आहे.

 

या आरोपाला महापालिकेनं देखील दुजोरा दिला आहे. या दोन्ही दाखल्यांमध्ये फक्त एकच गोष्ट वेगळी ती म्हणजे जन्म तारीख. एका दाखल्यात ५ सप्टेंबर १९९० तर दुसऱ्या दाखल्यात ५ सप्टेंबर १९९१ अशा जन्म तारखा आहेत. प्रिया गदादे यांनी १९९० या जन्म तारखेच्या आधारे निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांचं वय २१ वर्षे सहा महिने आहे.

 

मात्र दुसऱ्या दाखल्यानुसार त्यांचे वय २० वर्षे ६ महिने आहे. त्यामुळे त्या निवडणूक लढवण्यास अपात्र असल्याचा दावा पराभूत उमेदवारानं केला आहे. तर ही जन्म तारीख चुकीची दिली गेल्यामुळे महापालिका आणि ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला जन्म तारीख बदलवण्याची विनंती कित्येक वर्षांपूर्वीच केल्याचा दावा प्रिया गदादे यांनी केला आहे.