राज ठाकरेंची पवारांच्या बालेकिल्यातून सुटका

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.

Updated: Sep 14, 2012, 01:08 PM IST

www.24taas.com, बारामती
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.
यावेळी हिमाचल प्रदेश मधील एका ट्रकवर बारामतीत दग़डफेक झाली होती. या प्रकरणी बारामती पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. शिवाय राज ठाकरे यांना सहआरोपी करण्यात आलं होतं.
या प्रकरणाची आज सुनावणी होती. राज ठाकरे बारामती कोर्टात हजर राहिले. कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला. शिवाय त्यांनी खटल्यातून वगळण्याची मागणीही केली.