मराठी साहित्य संमेलन, नव्या वादाची ठिणगी

सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 3, 2014, 03:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.
उद्घाटनानंतर आज रात्री ८ ते ११ या वेळेत होणा-या कवी संमेलनासाठी ख्यातनाम कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे आणि अरूण म्हात्रे आदींना निमंत्रणच देण्यात आलेले नाही. गेली अनेक वर्षे कवी संमेलनामध्ये जान आणणा-या या तिघा प्रख्यात कवींना यंदा निमंत्रण का देण्यात आलं नाही, असा प्रश्न तमाम मराठी रसिकांना पडलाय.
या तिघा ज्येष्ठ कवींना डावलण्यामागे काही राजकारण आहे का, अशीही चर्चा रंगलीय. कवी संमेलनाचं निमंत्रणच नसल्यानं हे तिघे कवी साहित्य संमेलनाच्या मांडवात यंदा दिसणार नाहीयत. त्यामुळे साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच त्याचं `कवित्व` सुरू झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.