‘दादां’च्या दादाला जामीन मंजूर

पुण्यातल्या अल्पवयीन मुलांच्या पार्टी प्रकरणी रेस्टॉरंट मालक जयंत पवार यांना कोर्टानं जामीन दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 5, 2012, 08:58 AM IST

www.24taas.com, पुणे
पुण्यातल्या अल्पवयीन मुलांच्या पार्टी प्रकरणी रेस्टॉरंट मालक जयंत पवार यांना कोर्टानं जामीन दिलाय.
जयंत पवारांच्या विरोधात मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मंगळवारी जयंत पवार लष्कर कोर्टात हजर झाले होते. कोर्टानं त्यांना १० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. पवारांच्या रिव्हर व्ह्यू रिसॉर्टमध्ये २५ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलांची पार्टी रंगली होती. पोलिसांनी या पार्टीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच ठिकाणी अल्पवयीन मुलांची पार्टी रंगली होती. मात्र, पोलिसांनी जयंत पवारांविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. अखेर ग्रामीण पोलिसांनी माया हॉटेलच्या मालकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर शहर पोलिसांना जयंत पवारांविरोधात गुन्हा दाखल करणं भाग पडलं होतं.
जयंत पवार हे अजित पवार यांचे चुलत बंधू आहेत, त्यामुळे कारवाईला टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.