डॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 3, 2013, 12:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.
मूळचे हिरवे गावातील खानापूर तालुक्यातील ते रहिवासी आहेत. मुळात १२ किलोमीटरवरील लोकांना शेटफळे हद्दीत `रोहयो` मध्ये काम देता येत नाही. मात्र हा नियम धाब्यावर बसवला.. यावरच ते थांबले नाहीत, तर २५७ दिवस बोगस हजेरीही दाखवत पैसे हडप केलेत. तर शेटफळे इथंच बारावीच्या विद्यार्थ्यानेही १०६ दिवस मजुरी केल्याचं उघड झालंय.. मूळात ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय बोर्डाच्या परीक्षेला बसता येत नाही. मात्र या विद्यार्थ्यांची १०६ दिवस मजुरी दाखवल्यानं त्याची शाळेतील उपस्थिती हा संशोधनाचा विषय बनलाय.
याच शेटफळे गावामध्ये २०११ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण `रोहयो`ची कामे पाहण्याकरिता आले असताना त्यांच्या समक्ष गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी शेटफळेत `रोहयो`च्या कामात होणारा भ्रष्टाचार उघड केला होता. त्यावेळी खोटे मजूर कामाला दाखवण्यात आले होते.
या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र याबाबतचं सत्य अजूनही गुलदस्त्यातच आहे. आता तर पुन्हा बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघड झालीय.. या प्रकरणी चौकशी सुरु असून दोषींवर कारवाईचं आश्वासन बीडीओनीं दिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.