www.24taas.com, पुणे
प्रशासकीय अधिकारी जायला तयार नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागातील विकास रखडल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांची अशी रिक्त राहणारी पदं हे या विभागांचा विकास न होण्यामागील महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
पुण्यात नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी या महसूल विभागातील अधिका-यांच्या संघटनेचं अधिवेशन पार पडलं. त्यात बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अधिका-यांना हे खडे बोल सुनावले.
महसूल खात्यातील सर्वच अधिका-यांना पुणे विभागात पोस्टिंग हवं असतं. मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागात जायला कोणी तयार नसतं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अशा अधिका-यांना कानपिचक्या दिल्या.