www.24taas.com, पुणे
उन्हाळ्याच्या सुटी मध्ये बाहेर जाताय आणि त्यामुळे तुमचं घर काही दिवसांसाठी बंद राहणार आहे, तर पुणेकरांनो सावधान... कारण तुमच्या बंद घरात कधीही आग लागू शकते. पुण्यात सध्या दररोज असे तीन ते चार प्रकार घडतायत.
फायर ब्रिगेड स्टेशनमध्ये उन्हाळ्यात सतत फोन येत आहेत. दररोज आग लागण्याचे साधारण १५ प्रकार घडत आहेत. यातल्या बहुतेक आगी लागल्या आहेत बंद असलेल्या घरात. मार्च आणि एप्रिल महिन्यात पुण्यात एकूण आगी 565 आगी लागल्या आहेत. त्यापैकी 70 आगी शॉर्ट सर्किटनं लागल्या. गॅस गळतीमुळे 16 तर कच-यामुळे 246 आगी लागल्या आहेत.
त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत घर बंद करून काही दिवस बाहेर जाणार असाल, तर काळजी घ्या. रणरणतं ऊन, बंद असलेलं घर आणि सुरु ठेवलेला फ्रीज, विजेचा स्विच, गॅस सिलेंडर किंवा कचरा तुमच्या घरात कधीही आग लागू शकते.