www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सध्या व्हीआयपींना वेगळ्या गेटनं प्रवेश दिला जातोय. खरतर उत्सवाच्या किंवा महत्वाच्या दिवशी सगळ्या भक्तांना एकाच रांगेतून प्रवेश द्यावा असे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश असतांनाही हा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होतय..
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात उत्सवाच्या काळात आणि इतर महत्वाच्या दिवशी कोणालाही व्ही.आय.पी.मार्गानं सोडु नये असा आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिला होता. राज्य सरकारचा तसा जीआरही आहे. पण राज्यसरकारचा जीआर आणि सत्र न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत अजुनही नवरात्र उत्सव काळात महालक्ष्मी मंदीरात अनेकांना व्हीआयपी गेटमधून प्रवेश दिला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केलाय.
महालक्ष्मी मंदीरात अनेकांना व्हीआयपी गेटने प्रवेश दिला जात असल्याबद्दल भाविकांनीही नारजी व्यक्त केलीये. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने कायद्याचं उल्लंघन केलं की त्याला शिक्षा मग... सरकारच्या जीआरचं आणि सत्र न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणा-या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर आणि पोलीस प्रसासनावर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिक विचारतायत.....