तयारी करा `कात्रज ते सिंहगड` पार करण्यासाठी!

संपूर्ण कॉलेजविश्वाचं आणि ट्रेकर्सचं आकर्षण असणारी ‘के टू एस’ म्हणजेच कात्रज ते सिंहगड ही रात्रीच्या ट्रेकिंगची स्पर्धा यंदा २६ आणि २७ जुलैला होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 16, 2013, 11:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
संपूर्ण कॉलेजविश्वाचं आणि ट्रेकर्सचं आकर्षण असणारी ‘के टू एस’ म्हणजेच कात्रज ते सिंहगड ही रात्रीच्या ट्रेकिंगची स्पर्धा यंदा २६ आणि २७ जुलैला होणार आहे.
यंदा ११ वं वर्ष असणाऱ्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा ही स्पर्धा पहिल्यांदाच कॉलेजियन्स सोडून इतर गटांसाठीसुद्धा खुली होतेय.

२६ तारखेला रात्री ही स्पर्धा कॉलेज गटासाठी होईल तर २७ तारखेला सकाळी ही स्पर्धा डॉक्टर्स, आयटी प्रोफेशनल्स आणि फोर्टी प्लस या गटांसाठी होणार आहे. कात्रज घाटात असणाऱ्या बोगद्यापासून ही स्पर्धा सुरु होते आणि भर पावसात १३ टेक्ड्यांचा अडथळा पार करत सिंहगडावर पोहोचते. पुण्याच्या नॅशनल एज्युकेशन फ़ाउंडेशनतर्फे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं.
ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, त्यांनी ८६९८६५६५६५, ९८९०५४५८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.