मराठा आरक्षणाचे कोल्हापूर, सोलापुरात पडसाद

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात २५ टक्के आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलयं. या आंदोलनाचे पडसाद कोल्हापूर आणि सोलापुरात उमटले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 18, 2013, 03:00 PM IST

www.24taas.com,कोल्हापूर
मराठा आरक्षणावरून वादंग निर्माण झाला आहे. कोल्हापूर आणि सोलापुरात आंदोलन करताना जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणात शहरात तणाव निर्माण झाला आहे.
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात २५ टक्के आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलयं. या आंदोलनाचे पडसाद कोल्हापूर आणि सोलापुरात उमटले.
कोल्हापुरात मराठा आरक्षण संघर्ष समितीकडून पुणे- बंगळुरु महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक परिवहनच्या बसवरही दग़डफेक केली.

सांगली शहरात रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळं शहरातली वाहतूक काहीकाळ ठप्प झालीये. आंदोलन करणा-या 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. सरकारनं आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.