www.24taas.com, पुणे
वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी एक खुशखबर... पुणेकरांसाठी पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त निघालाय.
दिल्लीत नगरविकासमंत्री कमलनाथ यांच्यासोबत पुण्यातल्या सर्वपक्षिय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पुणे मेट्रोचं स्वरुप ठरवण्य़ात आलं. पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला यंदाच सुरुवात होणार आहे. पुणे मेट्रोचा सात किलोमिटरचा मार्ग भुय़ारी असणार आहे तर उर्वरीत मार्ग एलिव्हेटेड (जमिनीच्या वर) असणार आहे.
मेट्रोसोबत पुण्यात मोनो रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव यावेळी मांडला गेलाय. पुणे मेट्रो सुरु करण्याला सरकार प्राधान्य देणार आहे. मेट्रोच्या कामाचा कालावधी ठरवण्यासाठी दुपारी अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात निश्चित कालावधी ठरवण्यात येणार आहे. कमलनाथ यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार, सुरेश कलमाडी, प्रकाश जावडेकर हे नेते उपस्थित होते.