www.24taas.com , झी मीडिया, पुणे
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला मुन्नाभाई अर्थात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं विभागीय आयुक्त कार्यालयात पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. या अर्जांवर पोलिसांकडून मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
संजय दत्त ४२ महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी येरवडा जेलमध्ये दाखल झाला आहे. त्याला मागील महिन्यांत ब्लडप्रेशरचा त्रास झाल्याची चर्चा पसरली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकानं त्याची तपासणीही केली होती. त्यामुळं संजय दत्तकडून पॅरोलसाठी अर्ज केल्याचं सांगण्यात येतंय.
संजय दत्त हा मागील चार महिन्यांपासून येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय. येरवडा जेलमध्ये मे महिन्यांत भरती झालेल्या संजयनं पहिल्यांदाच पॅरोलसाठी अर्ज केला आहे. हा अर्ज प्राप्त झाला असून त्यावर पोलिसांचं मत मागविण्यात येणार आहे. पोलिसांचा अभिप्राय आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल, असं विभागीय आयुक्तांकडून सांगण्यात येतंय.
दरम्यान, पॅरोल रजा मिळविण्यासाठी कैद्यांकडून आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या वैद्यकिय समस्येचा आधार घेतला जातो. त्यामुळं आता ब्लडप्रेशरचा त्रास मुन्नाभाईला दिलासा मिळणार का? हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.