पांडुरंग घाडगेची `माया`... पोलिसांच्या जाळ्यात!

अवजड वाहनांची चोरी करून त्यांचे सुटेभाग विकल्याप्रकरणी मुख्य संशयित पांडुरंग घाडगेच्या सांगलीतल्या घरावर आणि गोडाऊनवर छापा सत्र सुरू आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 23, 2013, 04:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
अवजड वाहनांची चोरी करून त्यांचे सुटेभाग विकल्याप्रकरणी मुख्य संशयित पांडुरंग घाडगेच्या सांगलीतल्या घरावर आणि गोडाऊनवर छापा सत्र सुरू आहे. या छाप्यामध्ये आत्तापर्यंत अनेक ट्रक आणि कारचे इंजिन जप्त करण्यात आलेत. तसंच घरासाठी आकडा टाकून वीजेची चोरी केल्याचंही उघड झालंय.
अवजड वाहनांची चोरी करून त्यांचे सुटेभाग विकल्या प्रकरणातला मुख्य संशयित पांडूरंग घाडगे विरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आलेत. सरकारी कामात अडथळा, आत्महत्येचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि सावकारी याबाबत गुन्हे दाखल झालेत. पांडुरंग घाडगेला काल सांगली पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यानं आणि त्याच्या पत्नीनं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा हा प्रयत्न म्हणजे बनाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून घाडगे दाम्पत्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
दरम्यान तुपारी परिसरात पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या साह्यानं तपासणी केली. त्यात अनेक तोडलेल्या वाहनांचे भाग घटनास्थळी सापडलेत. पुण्यातल्या एका ट्रकची कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर घाडगेला अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

पांडुरंग घाटगेचं घर आणि गोडावुनवर छापा टाकला असता पोलिसांचेही डोळे विस्फारले...काय या छाप्यात मिळालं त्यावर एक नजर टाकूया...
पांडुरंग घाटगेची `माया`...
 वाहन चोरीप्रकरणी घर आणि गोडाऊनवर छापासत्र
 10 ट्रकचे ऍक्सल रॉड, 6 ट्रकचे इंजिन जप्त
 10 इंडिका कारचे सांगाडे जप्त
 अनेक वाहनांचे छोटे, मोठे भाग सापडले
 घरासाठी आकडा टाकून केलेली वीज चोरीही उघडकीस

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.