www.24taas.com, झी मीडिया, पुणे
रुग्णसेवा करतात म्हणून महापालिकेनं खासगी रुग्णालयांना एफएसआयची खैरात वाटली… करांमध्येही सवलत दिली. बदल्यात या हॉस्पिटल्सनी महापालिकेनं सुचवलेल्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करायचे होते. प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयांनी महापालिकेला फक्त ठेंगाच दाखवलाय.…
पुण्यातलं सगळ्यात पॉश आणि तेवढंच महागडं रुबी हॉल हॉस्पिटल… रुबी हॉल हॉस्पिटलनं महापालिकेकडून वाढीव एफएसआय घेत, जास्तीचं बांधकाम केलं. म्हणजेच बेडची संख्या वाढली आणि हॉस्पिटलचा फायदाही… बदल्यात हॉस्पिटलनं महापालिकेनं सुचवलेल्या दहा टक्के गरीब रुग्णांवर मोफत उपचार करायचे होते. एफएसआय घेवून झाल्यावर मात्र हॉस्पिटलला या कराराचा सोयीस्करपणे विसर पडला.
जीएफएक्स इन रुबी हॉल हॉस्पिटलचाच कित्ता, सह्याद्री, औंध आणि इन्लॅक्स बुद्रानी या हॉस्पिटल्सनी गिरवलाय. या चार हॉस्पिटल्समध्ये दरवर्षी साधारण तीन हजार रुग्णांवर मोफत इलाज व्हायला हवा होता. म्हणजेच तीन वर्षांत साधारण ९ हजार रुग्णांना या सेवेचा लाभ मिळायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र गेल्या तीन वर्षात या चारही हॉस्पिटल्समध्ये मिळून फक्त १७० गरीब रुग्णांवर उपचार झालेत. जीएफएक्स आउट इतकं होऊनही महापालिका प्रशासन अजूनही हॉस्पिटलची बाजू घेताना दिसतंय.
फक्त एफएसआयचा नाही तर, महापालिका मिळकत कर, पाणी पट्टी आणि इतर अनेक करांमध्ये देखील या हॉस्पिटल्सना सवलत देते. महापालिकेव्यतिरिक्त राज्य सरकारकडूनसुद्धा ही हॉस्पिटल्स विविध सुविधा पदरात पाडून घेत असतात. मात्र ज्या गरीब रुग्णांच्या नावाने या सुविधा लाटल्या जातात. त्यांना मात्र खुशाल वा-यावर सोडलं जातंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.