पुणे : पुणेकरांच्याही रेल्वे बजेटकडून मोठ्या अपेक्षा अहेत. पुणेकरांच्या मागण्या मान्य होणार का, हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे. यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये पुण्याच्या वाट्याला काय येणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागलंय.
पुणे रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं करणार या घोषणेला आता कित्येक वर्ष लोटली. मात्र, आंतरराष्ट्रीय स्टेशनसाठी साधी एक वीटही अजून लागलेली नाही. तीच अवस्था इतर घोषणांची.
पुणे-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणाही अशीच हवेत विरलीय. पुणे - सोलापूर दरम्यान गाडी अडवून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. यशवंतपूर एक्स्प्रेस लुटण्याचा प्रकारही नुकताच घडला.
प्लॅटफोर्मची संख्या वाढवा, ही पुणेकरांची महत्त्वाची मागणी आहे. पुणे रेल्वे स्टेशनमधून दररोज दीडशे गाड्या सुटतात. त्यासाठी सध्या उपलब्ध असलेले सहा प्लॅटफोर्म अपुरे पडतात. पुणे ते दौंड रेल्वे लाईनचं विद्युतीकरण आणि लोकल सेवा सुरु करणं हे कामही धीम्या गतीनं सुरु आहे. पुणे कोल्हापूर रेल्वे लाईनचं दुपदरीकरण लवकरात लवकर व्हायला हवं....
पुणं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थानक व्हायचं असेल तेंव्हा होवो मात्र सामान्य प्रवाशांना जलद, सुखकर आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी देण्यात आलेली आश्वासनं आधी पूर्ण करावीत, एवढीच सामान्य़ पुणेकरांची अपेक्षा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.