११० किलोंचा चार पायांचा मल्ल!

इंदापूर तालुक्यातील मारकड बापूंचा `राजा` मल्ल दरोरोज दोन किलो गहू, मका, कणकेचे गोळे, म्हशीचे दूध आणि सहा अंडी असा खुराक घेतो. चार पायांवर ११० किलोचे वजन तोलणाऱ्या `राजा`चं पंचक्रोशीत काय ते कौतुक...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 24, 2014, 09:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इंदापूर
इंदापूर तालुक्यातील मारकड बापूंचा `राजा` मल्ल दरोरोज दोन किलो गहू, मका, कणकेचे गोळे, म्हशीचे दूध आणि सहा अंडी असा खुराक घेतो. चार पायांवर ११० किलोचे वजन तोलणाऱ्या `राजा`चं पंचक्रोशीत काय ते कौतुक...
इंदापूर तालुक्यातील पडस्थळ गावात माडग्याळ जातीचा हा मेंढा... हा एक महिन्याचा असताना मारकड बापूंनी  ३० हजार रुपयांना खरेदी केला. मोठ्या प्रेमानं त्याला वाढवलं. दरोरोज दोन किलो गहू, मका, कणकेचे गोळे, म्हशीचे दूध, सहा अंडी  असा आहार देऊन या गडीला त्यांनी चांगलंच तयार केलं. आता तो दोन वर्षांचा झालाय. भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पडस्थळ गाव पहिलवानांसाठी प्रसिध्द आहे. प्रत्येक घरात एकतरी मल्ल अशी या गावची ख्याती आहे. संदीपान बापूंच्या घरी गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशी जनावरे आणि कोंबड्या आहेत. एकीकडे शेतीचं यांत्रिकीकरण होत असताना दुसरीकडं जनावरं हद्दपार  होत असल्याचं चित्र आहे. मात्र बापूंनी आपल्या शेती व्यवसायात  जनावरांना मोठं स्थान दिलंय.  
`राजा`ला परिसरात फिरण्यासाठी चार चाकी असते. "यहॉंके हम है राजकुमार आगे पिछे हमारी सरकार" अशा ऐटीत तो फेरफटका मारतो. राज्यस्तरीय पशु प्रदर्शनात प्रथम क्रमांक आलेल्या राजाती नागपूर येथील राष्ट्रीय प्रदर्शनात निवड झालीय.
११० किलोच्या या मल्लानं एका टकरीत भल्याभल्यांना आसमान दाखवलंय. राष्ट्रीय पातळीवरही तो आपली ताकद दाखवुन तालुक्याच नाव मोठं करेल अशी खात्री गावकऱ्यांना आहे.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.