आत्महत्या वाढतायत : सामाजिक स्वास्थ्य धोक्यात?

गेल्या सहा महिन्यात शहरात २० आत्महत्या झाल्यात. विशेष म्हणजे त्यात तब्बल ७० टक्के आत्महत्या शालेय आणि महविद्यालय तरुणांनी केल्यात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 21, 2012, 11:37 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये अचानकपणे आत्महत्येचा मुद्दा चर्चेला आलाय. गेल्या सहा महिन्यात शहरात २० आत्महत्या झाल्यात. विशेष म्हणजे त्यात तब्बल ७० टक्के आत्महत्या शालेय आणि महविद्यालय तरुणांनी केल्यात. शहराचं सामाजिक स्वास्थ बिघडलं असल्याचं समोर आल्यानं चिंता व्यक्त केली जातंय.
पिंपरीतल्या उद्यमनगर परिसरातल्या उच्चभ्रू कुटुंबातल्या प्रियांका मुराडे या २२ वर्षिय तरुणीनं आत्महत्या केल्यानं एकाच खळबळ उडाली. तिच्या आत्महत्येचं नेमक कारण स्पष्ट झालं नसलं तरी शहरात वाढत असलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनल्या. शहरात गेल्या सहा महिन्यात २० आत्महत्या घडल्या आहेत. १८ वर्षीय आदित्य अरुण कांबळे, १५ वर्षीय मनोज श्रीमंत गोरे, ३६ वर्षीय दिपाली बडे, २१ वर्षीय कविता शिंदे, २० वर्षीय शीतल महादेव आव्हाड या तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवलीय.
या आत्महत्या रोखण्यासाठी आता पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागतोय. ‘युवा वर्गानं संकटांना घाबरून न जाता परिस्थितीशी मुकाबला करावा’ असं आवाहन सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले यांनी केलंय.
स्पर्धेचा अतिरेक आणि ढासळलेला आत्मविश्वास यामुळं तरुण पिढी आत्म्हत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतेय, असं तज्ज्ञांना वाटतंय. निराश झालेल्या विद्यार्थ्यांना कुटुंबात आणि महाविद्यालयात समुपदेशन करण्याची गरज निर्माण आता प्रकर्षानं व्यक्त होतेय.