www.24taas.com, प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी
शिर्डीजवळ राहता शहरात शिवाजी संकुलात दरोडेखोरी करण्याचा प्रयत्न एका सतर्क सुरक्षामुळे फसला. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झालाय.
मंगळवारी पहाटे एक ते दीडच्या सुमाराला राहता शहरातल्या व्यापारी संकुलात दरोडेखोरांनी लक्ष्मी ज्वेलर्स, नागरे ज्वेलर्सह भांड्याचं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. दहा ते 12 शस्त्रधारी दरोडेखोर हा प्रयत्न करत होते. मात्र या दरोडेखोरांना सुरक्षा रक्षकांनी हटकलं.
त्यापूर्वी त्यांनी दोन दुकानं फोडली होती. मात्र सुरक्षा रक्षकानं हटकल्यावर दरोडेखोर त्याच्या मागे हत्यार घेऊन धावले. मात्र सुरक्षा रक्षकाने तिथून पळ काढत पोलीस आणि पालिका कर्मचा-यांना माहिती दिली
सदर दरोडेखोरांचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांमुळे फसल्याचे पाहता त्यांनी तेथुन पळ काढला. दरोडेखोरांच्या हातात कत्ती , कटर , शटर तोडण्यासाठी लागणारे साहित्य फुटेज मध्ये दिसत आहे... दरोडेखोरांचा सर्व कारनामा ज्वेलर्सच्या सिसीटीव्ही कँमेरामध्ये कैद झाला आहे. याबाबत राहाता पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.